सीधे मुख्य सामग्री पर जाएं
अरूण चद्र रॉय के संग्रह खिडकी से समय में "कील पर टँगी बाबुजी की कमीज़" का मराठी अनुवाद करने कि कोशीश


खिळ्याला टांगलेला बाबाचा शर्ट

आज
खूप आठवण येतेय ,
खिळ्यावर टांगलेल्या
बाबांच्या त्या शर्टाची .

शर्टाचा  खिसा
खूप जड असायचा , 
सारं ओझं  सहन करायचा
तो एकटा खिळा .

खिश्यात  असायची
किराणा सामनाची यादी ;
ज्याच्यासाठी बाबा
आठवडाभर धावपळ करत. 
आईच्या ओरडा खात खात,
वेगेवेगळी निमित्ते  करत असत  बाबा .
आटापिटा करत  पैशाची जमवाजमव (बंदोबस्त) झाल्यानंतर
शेवटी कसेबसे यायचे  रेशन .

खिळा साक्षी असायचा
ह्या सर्व (जमवाजमवीचा, धावपळीचा ) निमित्तांचा ;

निमित्तांचे ओझे ,
जे बाबांच्या मनावर होते ,
त्याचासुद्धा  साक्षी असायचा तो खिळा .


बाबाच्या खिशात असायची
आजोबांची पत्रे.

पत्रात आशिर्वादाबरोबर असायचा
सामानाचा हि हिशेब .
बाबांना कधी तो हिशेब लागायचा
तर कधी लागत नसे.

हे सर्व माहित असायचं त्या खिळ्याला .

खिळा त्या दिवशी खूप आंनदी होता ,
जेव्हा होता बाबांच्या खिश्यात
माझ्या परीक्षेचा निकाल .
सर्व झोपी गेल्या नंतर
अभिमानाने त्यांनी दाखवलं होतं
आईला झोपेतून जागं करुन .

खिळा त्या दिवशी सुद्धा खूप आंनदी होता
ज्या दिवशी बाबांनी
वाचली होती माझी पहिली कविता .
आणि पुन्हा आईला
झोपेतून जागं केलं होत.

बाबांच्या खिश्यात
जेव्हा असायची
डॉक्टरांची चिट्ठी.

तेव्हा ती वाचून
निराश व्हायचा खिळा ;
आईच्या अगोदर .

भिंतीवर ठोकल्यापासून
पहिल्यांदाच इतका खुष होता खिळा;
जेव्हा बाबा घेऊन  आले होते
आई साठी जोडवी,
आपल्या शेवटच्या पगारातून.

आज
बाबा नाहीत,
त्यांचा शर्ट पण नाही,
पण
खिळा आहे ;
आजही
आईच्या मनात
अन आमच्या पण.

टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

जरूरी नही है

घर की नींव बचाने के लिए  स्त्री और पुरुष दोनों जरूरी है  दोनों जितने जरूरी नहीं है  उतने जरूरी भी है  पर दोनों में से एक के भी ना होने से बची रहती हैं  घर की नीव दीवारों के साथ  पर जितना जरूरी नहीं है  उतना जरुरी भी हैं  दो लोगों का एक साथ होना

दु:ख

काली रात की चादर ओढ़े  आसमान के मध्य  धवल चंद्रमा  कुछ ऐसा ही आभास होता है  जैसे दु:ख के घेरे में फंसा  सुख का एक लम्हां  दुख़ क्यों नहीं चला जाता है  किसी निर्जन बियाबांन में  सन्यासी की तरह  दु:ख ठीक वैसे ही है जैसे  भरी दोपहर में पाठशाला में जाते समय  बिना चप्पल के तलवों में तपती रेत से चटकारें देता   कभी कभी सुख के पैरों में  अविश्वास के कण  लगे देख स्वयं मैं आगे बड़कर  दु:ख को गले लगाती हूं  और तय करती हूं एक  निर्जन बियाबान का सफ़र

क्षणिकाएँ

1. धुएँ की एक लकीर थी  शायद मैं तुम्हारे लिये  जो धीरे-धीरे  हवा में कही गुम हो गयी 2. वो झूठ के सहारे आया था वो झूठ के सहारे चला गया यही एक सच था 3. संवाद से समाधि तक का सफर खत्म हो गया 4. प्रेम दुनिया में धीरे धीरे बाजार की शक्ल ले रहा है प्रेम भी कुछ इसी तरह किया जा रहा है लोग हर चीज को छुकर दाम पूछते है मन भरने पर छोड़कर चले जाते हैं