अरूण चद्र रॉय के संग्रह खिडकी से समय में "कील पर टँगी बाबुजी की कमीज़" का मराठी अनुवाद करने कि कोशीश खिळ्याला टांगलेला बाबाचा शर्ट आज खूप आठवण येतेय , खिळ्यावर टांगलेल्या बाबांच्या त्या शर्टाची . शर्टाचा खिसा खूप जड असायचा , सारं ओझं सहन करायचा तो एकटा खिळा . खिश्यात असायची किराणा सामनाची यादी ; ज्याच्यासाठी बाबा आठवडाभर धावपळ करत. आईच्या ओरडा खात खात, वेगेवेगळी निमित्ते करत असत बाबा . आटापिटा करत पैशाची जमवाजमव (बंदोबस्त) झाल्यानंतर शेवटी कसेबसे यायचे रेशन . खिळा साक्षी असायचा ह्या सर्व (जमवाजमवीचा, धावपळीचा ) निमित्तांचा ; निमित्तांचे ओझे , जे बाबांच्या मनावर होते , त्याचासुद्धा साक्षी असायचा तो खिळा . बाबाच्या खिशात असायची आजोबांची पत्रे. पत्रात आशिर्वादाबरोबर असायचा सामानाचा हि हिशेब . बाबांना कधी तो हिशेब लागायचा तर कधी लागत नसे. हे सर्व माहित असायचं त्या खिळ्याला . खिळा त्या दिवशी खूप आंनदी होता , जेव्हा होता बाबांच्या खिश्यात माझ्या परीक्षेचा निकाल . सर्व झोपी गेल्या नंतर अभ...